मुंबईत पावसाचा जोर, पुढील दोन दिवस झमाझम

मुंबई - पहिला पाऊसच मुंबई शहर आणि उपनगरासाठी अनेक तक्रारी घेऊन येणार ठरला. शुक्रवारी पहिल्याच पावसाने झोडपले आणि पुढील दोन दिवसही मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात व मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. मागील एक दिवसापासून कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही

ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे अनेक तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहे ज्यात मुंबई शहरात आणि उपनगरात 6 ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. आपत्कालीन

नियंत्रण कक्षाहून प्राप्त माहितीनुसार 50 हून अधिक ठिकाणी झाडे कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक रस्ते तसेच बाजार पाण्याने तुंबले आहेत.

तसेच पहिल्या पावसातच लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाचा रुळावर पाणी साचणार नाही हा दावा मात्र पहिल्याच पावसाने खोटा ठरविला आहे. रेल्वे मार्गात पाणी साचू नये म्हणून
पंप मशीन बसविण्याची तरतूद केली असली तरी काही गाड्या ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर लोकल 15 मिनिटे उशिराने धावत होत्या.

सतत होत असलेल्या पावासामुळे अनेक जागी गुडघ्यांपर्यंत पाणी साचले आहे. वाहनांची गतीला ब्रेक लागले आहेत त्यामुळे ट्रॅफिक विस्कटलं आहे. जेथे-तेथे जाम लागत असल्यामुळे लोकं खोळंबून राहिले आहेत. पश्चिमी उपनगरात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे, म्हणे मुंबई ...

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे, म्हणे  मुंबई कर्नाटकचा भाग होता, मुंबईवर आमचा हक्क आहे
बेळगाव म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकारनं बेळगावचं नामकरण बेलगाम करून ...

अबू आझमींच्या भाषणाची चौकशी करा, भातखळकर यांंच अमित शहा ...

अबू आझमींच्या भाषणाची  चौकशी करा, भातखळकर यांंच अमित शहा  यांना पत्र
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचं कनेक्शन हे मुंबईतील आझाद मैदानातील ...

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाची नोटीस
भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहलीस ऑनलाईन रमी गेमींगचे प्रमोशन केल्याप्रकरणी केरळ ...

बालभारतीकडून वर्षभरात शैक्षणिक चॅनेल सुरू करणार

बालभारतीकडून वर्षभरात शैक्षणिक चॅनेल सुरू करणार
बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी ...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डॉ. मानवेंद्र ...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डॉ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन
औरंगाबाद : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ...