शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:52 IST)

कोकण दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा बरसणार सरी

mumbai rain 2
उन्हाळा असताना सध्या राज्यात अवकाळी पावसाची हाजिरी सुरु आहे. आता पुन्हा कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात तापमानात वाढ झाली असून काही ठिकाणी उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. राज्यात काही ठिकाणी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. राज्यात सर्वात अधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 44.2 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. तर सर्वात कमी किमान तापमान 18.4  नाशिक येथे नोंदले गेले. 
 
कोकणात  काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. तर गेल्या  24 तासात कोकण, गोवा, आणि मध्य महाराष्ट्रात सांगली इथे पावसाची नोंद झाली. येत्या 19,20 आणि 21 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे.