सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (20:49 IST)

उत्तर महाराष्ट्रात आजपासून तीन दिवस पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट ...

rain
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुळसाधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार (ता. २१) पासून तीन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस होईल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  
 
वायव्य बंगाल उपसागर आणि ओडिशा किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते वायव्य दिशेकडे सरकरणार आहे. शिवाय कमी दाबाची रेषा मध्य प्रदेश भागातून जात आहे. त्यामुळे पावसाची शक्यता आहे.
 
दरम्यान गुरुवारी नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगरसह २० जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस होईल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज आहे. हीच स्थिती शुक्रवारी (ता. २२) नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत, तसेच शनिवारी (ता. २३) नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत असेल.