Widgets Magazine

बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं हे दुर्दैवी : राज ठाकरे

raj thakare
Last Modified सोमवार, 31 जुलै 2017 (09:10 IST)

बाबासाहेब पुरंदरे

यांना एकीकडे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरव होतो. त्याच बाबासाहेबांनी शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. त्यांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावं लागतं, यासारखं दुर्दैव नाही.” अशा शब्दात राज ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे. मुंबईत
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त ‘शिवशाहीर सन्मान सोहळा’ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

बाबासाहेबांच्या टीकाकारांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, ”काही जणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेले व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. पण बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातीलआक्षेपांवर
चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना
जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. ”यावर अधिक वाचा :