Raj Thackeray : 'वेदांता' प्रकल्प महाराष्ट्रातून वळवलाच कसा?या विषयाची सखोल चौकशी व्हावी, राज ठाकरेंचा सवाल
महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
वेदांता प्रकल्पावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'प्रचंड रोजगारनिर्मितीचा 'वेदांता ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून म्हंटले आहे, कि फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असे मत त्यांनी मांडले आहे.