शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (11:09 IST)

गर्दी सांगते ही विजयाची सभा - राज ठाकरे

मनसेच्या ’ माझा शब्द’ या जाहीर नामा प्रकाशित शिवसेनेवर कुठलीही टीका नाही 
 
नाशिकची व्हायरल झालेली शहर विकास नियमावली असं सांगते की ९ मीटरच्या खालील रस्त्यांवरील घरांना वाढीव एफएसआय मिळणार नाही..म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त नाशिक निर्वासित होणार... ही विकास नियमावली बाहेर आलीच कशी जर ती खरी आहे तर मुख्यमंत्र्यांनी ती रद्द करायची किंवा खोटी आहे हे मान्य करायचे, नुसत्या थापा द्यायच्या नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी शहर विकासच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. 
 
नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी आम्ही महापालिका म्हणून सर्वाधिक अधिक खर्च केला आणि यशस्वी करून दाखवला. केंद्राने त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार अमेरिकेत झाला नाही तर आमच्या महापौरांचा झाला असे राज यांनी सांगितले आहे. केंद्राने उज्जैन कुंभमेळ्याला 2200 कोटी आणि नाशिकच्या कुंभमेळ्याला 1100 कोटी मंजूर केले आणि फक्त ७०० कोटी दिले यातून त्यांनी दुजाभाव केला असल्याचे दिसत. राज ठाकरे आमच्या पक्षात मी पैसा खावू दिला नाही ना टेंडर दिली त्यामुळे अनेक नाराज झाली आणि ते सर्व पक्ष सोडून गेले, राजकारण करताना पैसा लागतो मात्र तो जनतेचा ओरबाडून आणून मी राजकारण करणार नाही असे राज यांनी नाशिक महापालिकेवर एकही भ्रष्टाचार आरोप नाही हे सांगताना स्पष्ट केले आहे.
 
सभेतली गर्दीच आपला विजय निश्चित करत आहे, भाजपने पैसे फेकले आणि ते गेले, पण ते एकटेच गेले आहेत, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना ठणकावलं.नाशिक महापालिकेवर पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही दाग नाही, हे झालं म्हणूनच काही जणांनी पक्ष सोडला, असंही राज ठाकरे म्हणाले.नाशिक म्हणजे मनसेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची विराट प्रचार सभा पार पडली. सभेला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याच सभेत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या ‘माझा शब्द’ या जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात आलं.

शहरांचा विकास ही माझी पॅशन आहे, हा माझ्यासाठी राजकारणाचा विषय नाही : राज ठाकरे
कुंभमेळ्यावेळी उज्जैनला 2200 कोटी आणि नाशिकला 1100 कोटी देत भेदभाव केला गेला
कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी महापौरांचा सत्कार अमेरिकेत झाला, मुख्यमंत्र्यांचा नाही : राज ठाकरे
काँग्रेस, राष्ट्रवादी प्रमाणेच भाजप सत्तेचा माज करत आहे, 88 गुन्हेगारांना निवडणुकीत तिकीट दिलं : राज ठाकरे
स्विस बँक खातेधारकांची नावं देऊच शकत नाही : राज ठाकरे
स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी द्या : राज ठाकरे
नाशिकची व्हायरल विकास नियमावली सांगते, 9 मीटर खालील रस्त्यांवरील घरांना वाढीव एफएसआय मिळणार नाही :राज ठाकरे