1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (09:13 IST)

अखेर कदम यांनी मागितली क्षमा

ram kadam
दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा एक मराठीतला आणि एक हिंदीतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हिंदीतल्या व्हिडिओत त्यांनी तमाम माता भगिनींचा सन्मान करतो आहे असे म्हणत ‘क्षमा’मागितली आहे. तर मराठीतल्या व्हिडिओत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वक्तव्यात 'माफी' हा शब्द त्यांनी कुठेही येऊ दिलेला नाही.
 
माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही सफाई किंवा स्पष्टीकरण न देता मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे. तर हिंदीमध्ये त्यांनी क्षमा या शब्दाचा वापर केला आहे. मात्र जे बोललो ती माझी चूक आहे मला माफ करा असे राम कदम या दोन्ही व्हिडिओंमध्ये एकदाही म्हटलेले नाहीत. 
 
याआधी राम कदम यांचे वादग्रस्त वक्तव्य जेव्हा समोर आले त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांची माफी मागावी अशी एकमुखी मागणी होते आहे.