शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:19 IST)

राणा दाम्पत्याला दिलासा नाही, आजची रात्रसुद्धा तुरुंगातच जाणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. राजद्रोहाचा तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यामुळे राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. परंतु उद्या पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. यामुळे राणा दाम्पत्याची आजची रात्रसुद्धा तुरुंगातच जाणार आहे.
 
राणा दाम्पत्याने मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासंदर्भात इशारा दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
 
मुंबई सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु व्यस्त कामकाजामुळे त्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी असे स्पष्ट करण्यात आले होती की, शक्य झाल्यास शुक्रवारी सुनावणी घेण्यात येईल अन्यथा त्या नंतर घेण्यात येईल. राणांच्या जामीन अर्जावर कोर्टात युक्तीवाद करण्यात आला की, याचिकाकर्ते आमदार, खासदार आहेत. त्यामुळे शक्य असल्यास थोडा वेळ तरी त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी सुनावणी घेत असाल तर आम्ही युक्तीवाद करण्यास तयार आहोत. मात्र न्यायालयाच्या वेळापत्रकानुसार आणखी काही महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. यामुळे जराही वेळ नसल्याने उद्या सुनावणी घेण्यात येईल असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले आहे.