रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (09:12 IST)

रंगपंचमीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली

Rang Panchami
लातूर : होळीनंतर पाचव्या दिवशी नाशिक सह   लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानूसार रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरु आहे. रंगपंचमीला जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठ आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.
 
रंगोत्सव साजरा करण्यासाठी लहानांपासून आबालवृद्धांमध्ये उत्साह संचारला आहे. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगोत्सव अर्थात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून रंगांसह विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यासह विविध प्रकारच्या पिचका-यादेखील बाजारात दाखल झाल्या आहेत. चिमुरड्यांसह तरुणाईची पावले रंग आणि पिचका-यांच्या खरेदीसाठी दुकानांकडे वळू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर रंगांची विक्री होत असून यंदा केवळ नैसर्गिक रंग विक्रीचा निर्धार केला असल्याची माहिती विक्रीत्यांनी एकमतशी बोलताना दिली. नैसर्गिक रंगांच्या वापराने त्वचेला हानी होत नाही. त्यामुळे विक्रीत्यांकडून केमिकल रंगांऐवजी नैसर्गिक रंगांची विक्री केली जात आहे. रंग आणि पिचका-यांच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निरनिराळ्या साहित्य खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होईल असे व्यावसायिकांनी सांगितले. बाजारात १५० ते २५० रुपये किलोपर्यंत रंगांची विक्री केली जात आहे.
 
लहान मुलांना आकर्षित करणारी टँक, एअर गन, बॅग स्टाइल, पाइप, स्मोक स्टील, बासरीच्या आकारातील, कार्टूनच्या अनेक पिचका-या तीस रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांना आकर्षक वाटणा-या या पिचकारी खरेदी करण्याठी मुले पालकांकडे हट्ट करत असून पालक देखील मोठ्या आनंदाने आपल्या मुलांचा हट्ट पुरवीत खरेदी करत आहेत असल्याची माहिती व्यापारी वर्गानी दिली आहे.
 
पिचकारी, मास्क, पाण्याचा फुगा, केसांचा विग, ओपी, नैसर्गिक रंग, गुलाल आदी वस्तूंची मागणी खूप वाढली आहे. यंदा रंगपचमीच्या सणामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील बाजारात दाखल होणारा हा सर्व रंग व विविध वस्तूचा माल दिल्लीतून मागवला जातो. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी होत असून यंदा नैसर्गिक रंगाला मोठी मागणी असल्याचे व्यापारी काझी शेख यांनी सागीतले आहे.  बाजार रंगांची उधळण करण्यासाठी बाजार कलर टॅक दाखल झाली आहे. अग्निशमन टाकीप्रमाणे दिसणारी कलर टॅक बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यात विविध कलर भरून ते स्प्रे करता येतात व टॅक रिकामी झाल्यास त्यात रंग भरून पुन्हा वापरात आणता येते. विशेषत: तरुणांकडून टॅकची खरेदी केली जात असल्याची माहिती विक्रीते सागर धाईजे यांनी दिली.
 
Editedb by Ratnadeep Ranshoor