1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. rape in solapur

नोकरीचे आमिष महिलेवर बलात्कार

सोलापूर येथील महिला नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या विवाहितेस नोकरीचे आमिष दाखवून कोल्हापूर, गाणगापूर, सोलापूरात या तीन  ठिकाणी नेऊन  तिघांजणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. पिडीत या  महिला ही शेळगाव. (ता. श्रीगोंदा.जि. अहमदनगर) येथील रहिवासी  आहे. त्यांचे वय ३५ आहे़ याप्रकरणी पिडीत महिलेने लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. 
 
यामध्ये पोलिसांनी   लगेच कारवाई केली असून पैगबर उर्फ सय्यद दगडू शेख (वय ४०), चंद्रकात महादेव स्वामी (वय ३१. सुलतानपूर.ता.अक्कलकोट), आप्पासाहेब दत्तू तोडकर (रा.नान्नज.ता.उत्तर सोलापूर) अशी बलात्कार प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या तिघांना सोलापूर रेल्वेस्टेशनवर ताब्यात घेतले आहे़.
पुढील लेख
लातूर मध्ये पश्चिम बंगालच्या मुली वैश्याव्यवसायात