जिल्ह्यातील ४८० ग्रामपंचायतींसाठी निघणार फेरआरक्षण
कोल्हापूर : जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यात येण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील नोव्हेंबर 2021 मध्ये मुदत संपलेल्या 5 व डिसेंबर 2022 ला मुदत संपणार्या 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी मे महिन्यात प्रभाग रचना व आरक्षण सोडत (ओबीसी आरक्षण वगळून) काढण्यात आले. येत्या काही महिन्यात या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक विभागाची तयारी सुरु आहे. परंतु बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा निकाल दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींसाठी काढण्यात आलेले आरक्षण रद्द होऊन पुन्हा नव्याने आरक्षण निघण्याची शक्यता आहे.