लातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी

water
Last Modified बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:15 IST)
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर शहराला केल्या जाणार्‍या पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून माहे सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जाईल. शहराची पाण्याची गरज पुरवण्यासाठी वॉटर ट्रेनसह इतर सर्व पर्यांयी पाणी पुरवठा योजनांचे काटेकोर नियोजन तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले.
लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळित चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजनीचे पाणी टँकरने आणणे व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका, महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये १५ टक्के पाणी कपात करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. महावितरण कंपनीने टंचाईच्या काळात लातूर महापालिका तसेच इतर कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी खंडित करु नये. असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. या टंचाईच्या भीषण परिस्थितीमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, व ग्रामसेवक यांनी टंचाईच्या कामांना सर्वोत्तम प्राधान्य दयावे. तसेच तहसिलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवडयाला तलाठी व ग्रामसेवकांची टंचाईबाबत बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांची सविस्तर माहिती ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, ...

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी
केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं विमान घसरल्याची धक्कादायक घटना घडली ...

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात

चंद्रकांत पाटील विरोधकांना जीवनातून उठवतात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांचे दोन चेहरे आहेत. त्यांचा ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली ...

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला
बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून ...

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स ...

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली
गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा ...