शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (16:24 IST)

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फेटाळून,आमदारांची जंगी मिरवणूक !

सध्या राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रभावाला बघता मुख्यमंत्री यांनी नागरिकांना कोरोनाच्या  नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.सध्या सणासुदीचे दिवस आहे,सगळे सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.राज्यात नागरिकांनी कोणत्याही राजकीय आणि सामाजिक समारंभात गर्दी करू नये. असे आवाहन देऊन देखील त्यांच्या आवाहनांना धता देत कोरोनाकाळात भर पावसात सांगोल्यातील शिवसेनेचे आमदारांनी गर्दी जमवत जंगी मिरवणूक काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आवाहनाला फेटाळून लावले आहे.सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे.अशा परिस्थितीत आमदारांनी मिरवणूक काढून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले आहे.त्यांनी असं केल्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता वाढली आहे.
 
सध्या कोरोनाचा धोका कायम आहे.त्यात सांगोल्यात खवासपुर गावात शिवसेनेच्या आमदारांनी काढलेली ही मिरवणूक नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते.