बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (09:17 IST)

इंदुरीकर महाराजांना दिलासा

indorikar maharaj
Relief to Indurikar Maharaj अहमदनगर - प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. पुत्रप्राप्तीविषयी इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  त्यानंतर इंदोरीकर महाराजांवर संगमनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरु होता आणि इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या होत्या. 
 
कोर्टाने इंदोरीकर महाराजांचे वकील के.डी. धुमाळ आणि अंनिस या दोहोंची बाजू ऐकून घेतल्यानंतर इंदोरीकर महाराजांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहेइंदोरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वतः कोर्टात हजर राहिले होते. खरंतर या प्रकरणावर शुक्रवारी (24 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र इंदोरीकर महाराजांना २४ तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कार्यक्रम असल्याने ते आजच कोर्टात उपस्थित राहिले. एक दिवस आधी कोर्टात उपस्थित राहतो अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती. जी कोर्टाने मान्य केली. त्यानंतर त्यांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.