गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2017 (15:03 IST)

आर्ची-परशा निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर

राज्यात होत असलेल्या निवडणूकांसाठी  सैराट’ चित्रपटातील आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहेत. 
महाराष्ट्रातील तरुणवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत मागे पडत आहे. तीन टक्के तरुणाईपैकी फक्त 1.1 टक्के जण मतदार प्रक्रियेत सहभागी होतात. हा टक्का वाढवण्यासाठी आणि भावी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली आहे. निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा मार्ग शोधून काढला आहे.

सैराटमधले आर्ची आणि परशा पुन्हा एकदा फोटो आणि बॅनरवर झळकणार आहेत. मात्र यावेळी निमित्त चित्रपटाचं नसून निवडणुकीचं आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्याचं आवाहन आर्ची-परशा करणार आहेत.