आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अखेर जेरबंद
मागील अनेक महिन्यांपासून खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला पुणे पोलिसांनी जेरबंद केले.
मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथके त्याच्या मागावर होती. अखेर आज त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
रवींद्र ब-हाटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुण्यातील कोथरूड, चतुःशृंगीसह वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या विरोधात मुक्का कायद्यानुसार कारवाई देखील केली आहे. ब-हाटेच्या काही साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. बराटे मात्र पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रवींद्र ब-हाटेची पत्नी संगीता ब-हाटे आणि मुलाला देखील अटक केली होती. त्याशिवाय त्याला मदत करणाऱ्या सुनील मोरे या वकिलाला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
अखेर आज ब-हाटेला काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे.