शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2017 (11:42 IST)

शहादा : पाणी वाटपावरुन हाणामारी, सभापती तेली यांचा मृत्यू

शहादामध्ये गरीब नवाज कॉलनीत पाणी वाटपावरुन दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा मृत्यू झाला. या भागात गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईची समस्या होती. त्यामुळे  नगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी पाणी वाटपावरुन माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख त्यांचे समर्थक व नगर पालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली, नगरसेविका पुत्र सैय्यद मुजफर अली, सैय्यद नासिर अली यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत गुप्ती व तलवारीचा खुलेआम वापर करण्यात आला. यात पाच जण जखमी झाले आहेत. यातील जखमी झालेले पालिकेचे बांधकाम सभापती असलेले नगरसेवक सद्दाम तेली यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.