शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (11:34 IST)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठया प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे.
 
राज्य सरकार याबाबत अधिकृत आदेश काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीबीबत महाविकास आघाडीतही एकमत आहे.