Widgets Magazine
Widgets Magazine

साईबाबा चरणी चक्क ३२ कोटींच्या दोन इमारती अर्पण

saibaba

विराराच्या ओम साईधाम ट्रस्टने शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील  दोन इमारती साईबाबा संस्थानाला चक्क देणगी म्हणून अर्पण केल्या आहेत. या दोन इमारतींची किंमत ३२ कोटी रूपयांहून अधिक असून साईबाबा चरणी अर्पण झालेली आजवरची ही आलेली दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी देणगी आहे.
 
पालघरच्या काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या नावावरील एकूण ९७८२.४४ चौरस मीटर बांधीव क्षेत्र असलेल्या साई पालखी निवाऱ्यातील दोन इमारती गुरुवारी साईचरणी अर्पण केल्या. या इमारतींची सरकारी दराप्रमाणे किंमत ३२ कोटी २७ लाख १३ हजार रुपये आहे. या दानपत्रासाठीचे १ कोटी ६३ लाख रुपये इतके नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संस्थानने भरले आहे.
 
डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखालील संस्थानाचे व्यवस्थापन मंडळ या इमारतीत राज्यातील गोर-गरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. अकादमी सुरु करणार आहे. या ओम साईधाम मंदिर ट्रस्टने शिर्डीला येणाऱ्या पदयात्रींसाठी शिर्डीजवळ २००८ मध्ये साईपालखी निवारा उभारला आहे. याठिकाणी पदयात्रींना निवास आणि भोजनाची मोफत सेवा पुरवण्यात येते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आधार पॅन कार्डला जोडण्यासाठी नवी वेबसाईट

आयकर भरण्यासाठी यापुढे आधार ओळखपत्र पॅन कार्डला जोडणे अनिवार्य असणार आहे. यासाठी आयकर ...

तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांचा अपघात, 11 ठार

मध्य प्रदेशात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या गोंदियातील 11 मजुरांचा अपघातात मृत्यू झाला ...

news

मुंबईतल्या कोस्टल रोडला अंतिम मंजुरी, वाहतुकीची कोंडी फुटणार

मुंबईतल्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतिम मंजुरी दिली आहे, अशी माहिती ...

news

दानवे पदावर राहणे विरोधकांच्या फायद्याचे : शरद पवार

रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे, त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला ...

Widgets Magazine