1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

स्ट्रेचरवर केले दर्शन, भक्तीला साई चमत्काराची आस

आठ वर्षांपासून कोमात असलेल्या आणि पेशानं डॉक्टर असलेल्या 37 वर्षीय तरुणीला कुटुंबातील सदस्यांनी साईंच्या दरबारी आणलं. सुमारे 600 किमीचा प्रवास करवून तिला साईदर्शन घडवले. यावेळी बाबांच्या दरबारातही पहिल्यांदा एखाद्या रूग्णाला अशाप्रकारे स्ट्रेचरवर दर्शनासाठी आणण्यात आले होते. यावेळी साईबाबांनीच तिला आता बरं करण्याचं साकडं तिच्या घरच्यांनी घातलंय.  
 
वर्धा शहरात राहणारे मुंगल कुटूंबीय बाबाराव यांना दोन मुली आहेत. ते एस टी महामंडळातून ते  सेवानिवृत्त झालेत. त्याची  मोठी मुलगी शितल गेल्या आठ वर्षांपासून कोमात गेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत शीतलने बालरोग म्हणून एमडीपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि मुंबई येथील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये बालरोग विभागात आयसीयु इनचार्ज म्हणून रुजू झाली. त्यानंतर शीतलचा विवाहसुद्धा झाला. लग्नानंतर सर्व काही सुरळीत होते. दरम्यान  हॉस्पिटलमध्ये काम करत असताना पायरी उतरताना तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. तेव्हापासून ती कोमात आहे गेल्या सात वर्षांपासून देशभरातील अनेक हॉस्पिटल मध्ये आई वडिलांनी तिला उपचारासाठी नेलं मात्र अद्याप यश मिळू शकले नाही. 
 
अखेर तिला आपल्या वर्धा येथील निवासस्थानी ठेवण्याचा निर्णय घेतला. बाबाराव यांचे मित्र व साईसेवक म्हणून काम केलेले मुंबई येथील भाटिया यांनी कुटुंबियांना साई दरबारी येण्याची विनंती केली आणि आज मुंगल कुटूंबीय थेट वर्ध्याहून 600 किमी रुग्णवाहिका घेऊन साई दरबारी आले. तिला जेव्हा स्ट्रेचरवर साईमंदिरात दर्शनासाठी नेले जात होते.