testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

युवतींनो लढायाला शिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - सक्षणा सलगर

sakshana salgar
Last Modified मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (15:25 IST)
अंबड, जिल्हा जालना येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की युवतींनो लढायला शिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. युवतींनी स्वत: पुढे येऊन लढा देण्याची गरज आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता हिमतीने संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसा, युवतींनो ताठ मानेने जगायला शिका, युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येऊन समाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुलींची छेड काढणाऱ्यांना व अश्लील भाषा करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या, स्त्री शिकली तरच संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. त्यामुळे आजच्या युवती उद्याच्या इंदिरा, प्रतिभाताई पाटील आहेत, उद्याचा देश तुमच्या हाताने घडणार आहे, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे जिद्द आणि चिकाटीने यशस्वी वाटचाल करा. उद्याचे भविष्य तुमच्याच हातात आहे, असे आवाहन सलगर यांनी केले.

माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासारखे उच्चशिक्षित, विकासप्रिय नेतृत्व जालना जिल्हयाला लाभलेले आहे, हे आपले भाग्य आहे. आपण सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून येणाऱ्या काळातही करत राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, प्राचार्य डॉ.भागवत कटारे, जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखाताई लहाने, जिल्हा युवती अध्यक्षा कुं.योगीता चंद, घनसावंगी न.प.नगराध्यक्षा प्राजक्ता देशमुख, जि.प.सदस्या तथा महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा, नितू संजय पटेकर, पं.स.सभापती सरलाताई लहाने, मनिषाताई जंजाळ, प्रभा विष्णु गायकवाड,पुजा कल्याण सपाटे, ऍ़ड पुजा देशमुख, पं.स.सभापती मंजुषा कोल्हे, पं.स.सदस्या मनिषा काळबांडे, दमयंती कचरु मरकड, शोभा प्रभाकर रणदिवे, शेहनाजबी रहिम पठाण, साजिया शेख,पारुबाई खैरे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष कु.राधा खरपडे,उपाध्यक्ष कु.सरिता अगळे, सचिव वर्षा शिंदे जि.प.सदस्य, जयमंगल जाधव, तालुकाध्यक्ष अंबड भागुजी मैंद, युवक तालुकाध्यक्ष एड. अमोल लहाने, संभाजी देशमुख, शहराध्यक्ष अर्जुन भोजने, गौतम ढवळे, अविनाश जाधव, शरद अडागळे, अनिल गिरे, सुदर्शन जाधव, सुमित मुजगुले, राजु राठोड आदींची उपस्थिती होती.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

Camon iACE 2 आणि Camon iAce 2x स्मार्टफोन लॉच

national news
टेक्नो मोबाइलने भारतात त्यांचे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहे, ज्यांचे नाव Camon iACE 2 ...

लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार

national news
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस ...

नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन

national news
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन ...

माघी एकादशी : विट्ठल रखुमाईचा गाभारा आकर्षक फुलांनी सजला

national news
पंढरपुरात माघी एकादशी सोहळ्याला आलेल्या भाविकांनी ६५ एकर मधील परिसर तंबू, राहुट्यांनी ...

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : नरेंद्र मोदी

national news
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात संताप पसरला आहे. ...