शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (16:25 IST)

Sangali : सर्प दंशामुळे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू

snake
Sangali :सांगलीच्या जत तालुक्यात संख गावात सर्पदंशामुळे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रेया न्हावी असं या मयत मुलीचे नाव असून ती इयत्ता नववीत शिकत होती. 
सदर घटना सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या संख गावाची आहे. 

शनिवारी रात्री श्रेया जेवण करून आपल्या जागेवर झोपायला गेली. रात्री वीज गेल्यामुळे खूप अंधार होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास ती खडबडून जागी झाली आणि आरडाओरड करू लागली. तिला सापाने दंश केल्याचे समजले आणि तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.तिच्या मृत्यू विषारी सापाने दंश केल्यामुळे झाल्याचे डॉक्टरनी सांगितले.  

तिच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृत श्रेयाचे शवविच्छेदना करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. गावातील पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit