बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

या गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा

सांगली- जिल्ह्यातील हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या गोटखिंडीतील गणेशोत्सव गेल्या 37 वर्षांपासून सुरू आहे. यंदा हे या गणेशोत्सवाचे 38 वे वर्ष आहे. गावात दोन्ही समुदायाचे लोक मशिदीत गणेशोत्सव गुण्या गोविंदाने साजरा करतात.
 
विशेष म्हणजे हिदूंचे सण मुस्लीम साजरे करतात तर मुस्लिमांच्या सणात हिंदू नागरिक आनंदाने सहभागी होतात. यंदाचे 38 वे वर्ष असून बकरी, ईदही साजरी करण्यात येणार आहे.
 
1980 साली गोटखिंडी गावात खूप पाऊस पडला होता. त्यावेळी गणेश मूर्तीवर पाणी पडले होते. तेव्हा गोटखिंडीत हिंदू-मुस्लीम नागरिकांना गणेश मूर्ती कोठे ठेवायची असा प्रश्न पडला होता. तेव्हा मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन आपल्या मशिदीत गणपती स्थापन करू असा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गेले 38 वर्ष मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा जोपासली जाते आहे. अशी माहिती गावकर्‍यांनी ठेवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. सार्‍या देशाने आदर्श घ्यावा असे कार्य गोटखिंडीमध्ये सुरू आहे.