शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (10:12 IST)

संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची सवय लावावी - राज ठाकरे

Sanjay Raut should get in the habit of blabbering on in solitude - Raj Thackeray Marathi Regional News In Webdunia  Marathi
मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांची नक्कल केली आणि त्यावरून आता या दोन्ही नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरू झाली आहे.
 
राज ठाकरेंना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, नक्कल करून राजकारण होत नाही.
त्यावर आत राज ठाकरेंनी पुन्हा उत्तर दिलंय. ते म्हणाले, "संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी."
 
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे ठाण्यातील दिवा इथं उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.आता राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊत राऊत काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.