शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (09:18 IST)

संजय राऊत यांनी एकट्याने महाराष्ट्रात फिरून दाखवावं- नितेश राणे

nitesh rane
शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. 'संजय राऊत यांनी अयोध्या सोडा महाराष्ट्रात एकट्याने फिरुन दाखवावं,' असं आव्हान त्यांनी दिलं आहे. संजय राऊत शिवसेनेच्या कोट्यातून खासदार झालेत की शिवसेनेच्या असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
 
दिवा विभागात भाजपाचे कार्यालय सुरू केल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, "केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना एक टक्का लाज उरली आहे वाटतं, त्यामुळे त्यांनी काहीतरी देखावा केला आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्य सरकारकडे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करत होतो. मात्र नंतर आम्हाला समजलं आर्थिक बजेटचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना फक्त बॅगा आणणे आणि बॅगा पोहोचवणे एवढंच येतं," असा टोला राणे यांनी लगावला आहे.