मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (08:24 IST)

पेपर फुटी प्रकरणात नवे वळण, अटक केलेला संजय सानप भाजपचा पदाधिकारी

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा उपाध्यक्ष संजय शाहूराव सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. 
पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात याआधीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ८ जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून संजय सानप याची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले, संजय सानपला २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे. तो बीड शहरात राहतो त्याचा मोठा बंगला आहे.