शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (14:11 IST)

स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

suicide
सातारा- सैन्य दलात भरती करण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेऊन तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे गावात घडली आहे. दयानंद बाबुराव काळे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. 
 
या प्रकरणात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तरुणाच्या चुलत भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृताचा भाऊ शिवानंद बाबुराव काळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे की चुलत भाऊ प्रदीप विठ्ठल काळे हा सैन्य दलात भरती झाला असून दयानंद हा देखील भरतीसाठी प्रयत्न करत होता. तेव्हा प्रदीपने मला फोन करून दयानंदला सैन्य दलात भरती करतो मला पैसे द्या असे म्हटले. त्याने पंधरा दिवसात सैन्य दलात भरती झाल्याचे नियुक्ती पत्र येईल असे सांगत पैशाची मागणी केली. त्यानुसार वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन 9 लाख रूपये दिले.
 
मात्र पैसे देऊनही भरती होत नसल्याने दयानंदने तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. दयानंदने भरतीच्या नावाखाली प्रदीप काळेने फसवणूक केल्याचे स्टेटस ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप काळे याला ताब्यात घेतले गेले आहे.