शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (12:57 IST)

17 ऑगस्टपासून शाळा सुरु होणार नाहीत !

परदेशातील लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याची माहिती पेडियाट्रिक टास्क फोर्सने दिल्यानंतर अशात शाळा उघडल्या तर अडचण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया सर्व तज्ञ डॉक्टरांनी दिल्यावर तूर्तास हे लांबणीवर गेले आहे.
 
"ज्या जिल्ह्यात किंवा शहरात रुग्ण संख्या कमी झाली आहे, किंवा पूर्णपणे नाहीशी झाली आहे, अशा जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचे नियोजन करता येईल." असं सीतराम कुंटे यांनी स्पष्ट केलं.  17 तारेखेपासून शाळा सुरु करण्याचे आदेशावर पद्धतीने सुधारणा करता येईल व निर्णय घतेला जाईल.
 
बुधवारी रात्री संपन्न झालेल्या या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र या निर्णयाला राज्य सरकारने 24 तासांत ब्रेक दिला कारण टास्क फोर्स आणि पिडियाट्रिक टास्क फोर्स सर्वांनीच शाळा सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे.
 
मुलांचे लसीकरण न झाल्याने सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यास टास्क फोर्सने विरोध केल्यामुळे शाळा बंदच राहण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं.
 
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी, १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.
 
स्टेट टास्क फोर्सने संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही राज्य सरकारकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर गेला आहे.