गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (14:29 IST)

ज्येष्ठ नागरिकांनो, एसटीने प्रवास करणार आहात? मग हे वाचाच

st buses
एसटी बस म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात येते. या सवलतीचा ६५ पेक्षा जास्त वयाचे अनेक ज्येष्ठ नागरिक फायदा घेतात. परंतु त्यासाठी योग्य कागदपत्रे सादर करण्याची गरज असते. अनेक जणांकडे आधार कार्ड किंवा वयाचा संबंधित दाखला असतो. परंतु यापुढे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, अन्यथा दि. १ जुलैपासून प्रवासाची सवलत रद्द करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले आहे
सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. दरम्यान, स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता दि. ३० जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. डिजिटल इंडिया’उपक्रमाला हातभार लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने २०१८ मध्ये सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली. सदर योजना लागू झाल्यानंतर विनाकार्ड प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात येणार नाही, असेही महामंडळाने जाहीर केले आहे. कोरोनासह विविध कारणांनी या योजनेला मुदतवाढ मिळत गेली. मात्र, यावेळी दिलेली मुदतवाढ अंतिम असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे.
 
विशेष म्हणजे एसटी महामंडळाच्या माध्यमातून साधारण २९ विविध सामाजिक घटकांना ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू केली आहे. यात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजार असलेले रुग्ण, स्वातंत्र्यसैनिक, विविध पुरस्कारप्राप्त आदींना या सवलतीचा लाभ दिला जातो. दरम्यान, या सवलतीसाठी प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’अनिवार्य करण्यात आले आहे. ६५ वर्षावरील नागरिक एसटी सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या भाड्यात प्रवास करता येतो.
 
महामंडळाने या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी यापूर्वी ३१ मेपर्यंत मुदत होती. दरम्यान, आता ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याने १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी ‘स्मार्ट कार्ड’बंधनकारक करण्याचे ठरवले आहे.
 
‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ३१ मे २०२२ ही अंतिम मुदत होती. परंतु, ३० मे रोजी ही मुदत ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून ‘स्मार्ट कार्ड’शिवाय कुणालाही सवलत मिळणार नाही. राज्यात सध्या एसटीने प्रवास करणाऱ्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांकडे ‘स्मार्ट कार्ड’ नाही. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक एसटी सवलतीसाठी पात्र आहेत. या नागरिकांनी एसटीच्या नियमानुसार नोंदणी करून कार्ड घेतल्यास त्यांना निम्म्या तिकीट दरात प्रवास करता येतो.