गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:13 IST)

खळबळजनक: खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह

बैलपाळ्याच्या दिवशी ३ वर्षीय मुलगा आणि ९ वर्षीय मुलीसह घरातून निघून गेलेल्या पित्याचा मृतदेह खाणीमध्ये तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शंकर गुलाब महाजन (वय ३४, तिघेही मूळ रा.यावल, ता.जि.जळगाव, हल्ली रा.ओझर, नाशिक), पृथ्वी शंकर महाजन (वय ९) व प्रगती शंकर महाजन (वय ३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
 
शंकर महाजन हे मोलमजुरी करतात. ते दोन्ही मुलांना घरातून निघून गेले होते. ते कोठे जात आहेत, याबाबत काहीएक माहिती दिली नव्हती. सकाळी  सैय्यद पिंप्री शिवारातील खाणीमध्ये तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अहिरराव यांनी भेट दिली.