बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (14:56 IST)

लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्रीचें नाव वगळल्यावरून शंभूराज देसाईं राष्ट्रवादीवर संतापले

Shambhuraj Desai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थंमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेचा एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिंदे गटातील नेते शम्भूराज देसाई यांनी अजितपवार गटावर नाराजगी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, केंद्राच्या प्रत्येक योजनेवर पंतप्रधानांचं नाव असतं तर राज्यातील योजनेवर मुख्यमंत्रीचें नाव का नको. शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या योजना ‘हायजॅक’ केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. 
 
सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करत आहे. अजित पवार सध्या जन सन्मान यात्रा करत जनसंपर्क करत आहे. 
 
अजित पवार यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात योजनेचे पूर्ण नाव न वापरणे हे प्रोटोकॉलनुसार नाही, असे देसाई म्हणाले. योजनेच्या नावात 'मुख्यमंत्री' या शब्दाचा समावेश असून तो काढून टाकणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीने वापरलेल्या जाहिरातींमध्ये आणि साहित्यात या योजनेचे नाव माझी लाडकी बहीण असे दाखवले आहे. त्यांनी काढलेल्या व्हिडीओ मध्ये लाभार्थी अजित पवारांचे आभार मानताना दिसत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना मध्य प्रदेशच्या 'लाडली बहन योजने'पासून प्रेरित असून नुकतीच सुरू करण्यात आली आहे. महायुतीची सत्ता आल्यास या योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते.
सध्या या योजनेत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. 
Edited by - Priya Dixit