मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:05 IST)

शीतल आमटे यांनी आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येविषयी महत्त्वाचा उलगडा समोर येत आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जे इंजेक्शन टोचून शीतल आमटे यांनी आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी माहितीनुसार, डॉ. शीतल आमटे यांच्याशी नजिकच्या काळात संभाषण झालेल्या 90 % लोकांशी चौकशी पूर्ण झाली आहे. यानुसार आता पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हाती घेतल्यामुळे यामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहे.
 
अधिक माहितीनुसार, डॉ. शीतल यांचे निकटचे कुटुंबीय, नोकर, घरगुती मदतनीस यांचीदेखील चौकशी पुर्ण झाली आहे. इतकंच नाही तर डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठवला आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक असल्याचंही सांगण्यात येत आहे.
 
या तपासामध्ये विषारी इंजेक्शन घेत शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. नेमकं त्यांनी कोणतं विष घेत आत्महत्या केली याबाबत पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात माहिती स्पष्ट होईल. विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.