Widgets Magazine
Widgets Magazine

साई शिर्डी आता रात्री पूर्ण बंद

संपूर्ण जगात आणि देशात शिर्डी साई बाबा प्रसिद्ध आहेत. एक गुरु म्हणून अनेक नागरिक शिर्डी साई बाबा यांच्या कडे पहातात. तर दुसरीकडे  अनेक अपराध या ठिकाणी झाले आहेत. त्यावर एक उपाय म्हणून सर्वांनी निर्णय घेतला आहे. 
saibaba
आता शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवले जाणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  आहे. तर येत्या रविवारी रात्रीपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

साई मंदिर रोज सकाळी 4.30 वाजता काकड आरतीसाठी उघडले जाते. तर रात्री 10.30 वाजता शेजारती केल्यावर मंदिर बंद होते. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असा दर्जा आहे.

शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, पाकीटमारीसारख्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. यातून टोळ्या निर्माण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांनी संयुक्त बैठक घेऊन, यात रात्री उशिरापर्यंत सुरु राहणाऱ्या हॉटेल, हातगाड्या या रात्री 11 नंतर सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

या निर्णायाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता तरी शिर्डी परिसर उत्तम होईल का असा प्रश्न निर्माण होतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुक्तच्या कुलगुरुपदी डॉ. वायुनंदन यांची नियुक्ती

दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक ...

news

लोकशाहीत यश व अपयश येत असते: शरद पवार

महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...

news

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक स्पर्धेत सोहम पहिला

नुकतीच मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून राज्यस्तरीय चित्रकला ...

news

26/11 हल्ला करण्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना- दुर्रानी

मुंबईत झालेला 26/11 दहशतवादी हल्ला करण्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेचा हात होता ...

Widgets Magazine