1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018 (09:30 IST)

शिर्डी : साईबाबा मंदिर परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्याचे रिसायकलिंग

shirdi saibaba mandir
शिर्डीत साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी  मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पेप्सीको इंडिया व जेम इन्व्हायरो मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ खासदार दिलीप गांधी व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्या हस्ते या मशिनचा गुरुवारी लोकार्पण सोहळा झाला.
 
या पेट रिसायकलिंग मशिनमध्ये रिकामी कोणतीही प्लॅस्टिकची बॉटल टाकल्यास ती क्रॅश होऊन एक रुपयाचे कुपन मिळणार आहे. तसेच मशिनमध्ये हाताने प्रेस करून बाटली क्रॅश करण्याची सुविधा आहे. यातूनही एक रुपयाचे कुपन मिळेल किंवा अ‍ॅप डाउनलोड करून घेतला तर मोबाईल व्हॅलेटमध्ये एक रुपया जमा होणार आहे.