testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

गुरुपौर्णिमा उत्सव: साई चरणी तब्बल 5 कोटी 52 लाखांचे दान

sai baba
शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण केली आहे. साईचरणी तब्बल 5 कोटी 52 लाखांचं दान जमा झालं आहे.
दानपेटीत 3 कोटी रुपये आहेत, डोनेशन काऊंटवर 1 कोटी, तर चेक, डीडी आणि ऑनलाईन डोनेशनच्या माध्यमातून 1 कोटीचं दान साईबाबांच्या झोळीत जमा झालं आहे. 60 लाख रुपये किमतीचं 2 हजार 200 ग्रॅम वजनाचं सोनं आणि 8 किलो 400 ग्रॅम चांदीच्या वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत.

विविध देशातील 10 लाख रुपये किमतीचं परकीय चलन संस्थानाला प्राप्त झालं आहे. गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दानात 1 कोटी 40 लाखांनी वाढ झाली आहे.


यावर अधिक वाचा :