सिंधू दुर्ग मध्ये पुन्हा एकदा शिवसेना-भाजप मधील वाद पेटला
मुंबई नंतर आता सिंधुदुर्ग मध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप अमोर समोर आल्याने राडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.शिवसेनेने पेट्रोल वाटप केल्याच्या कार्यक्रमानंतर हा राडा झाल्याचे सांगत आहे.
प्रकरण असे आहे की शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आमदार वैभव नाईक यांनी भापचे ओळखपत्र दाखवा आणि एक लीटर पेट्रोल मोफत मिळवा अशी ऑफर सुरु केल्याने शिवसेना-भाजप कार्यकर्ते अमोर समोर येऊन राडा झाला.या मुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
झाले असे की शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ते कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्या कुडाळ पेट्रोल पंपावर ही घोषणा केली की 100 रुपयात दोन लीटर पेट्रोल आणि भाजप ओळखपत्र असल्यास एक लीटर पेट्रोल फ्री देण्यात येईल.घोषणा ऐकून सकाळ पासूनच पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली .तसेच भाजपचे कार्यकर्ते देखील त्या पेट्रोल पंपावर दाखल झाले आणि शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमामुळे त्यांच्या मध्ये वाद झाला.वाद आटोक्यात आणण्या साठी पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावे लागले.आणि त्यांनी शिवसेना आणि भाजप मधील झालेला राडा निवळला.