शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (11:23 IST)

शिवसेनेला पुन्हा एनडीएत स्थान मिळण्याची शक्यता मावळली - राम माधव

शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) स्थान मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा झाल्याचं भाजप नेते राम माधव यांनी   मुलाखतीत म्हटलं. राम माधव हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.
 
संजय राऊत यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे आणलं. तोपर्यंत शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यानं मुख्यमंत्रिपदाबाबत चकार शब्द काढला नव्हता, असं राम माधव म्हणाले.
 
तसंच, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे जोसेफ गोबेल्स असल्याची खोचक टीकाही भाजप नेते राम माधव यांनी केलीय.