मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युती होवो न होवे पण किरीट सोमय्या यांना मत नाहीत: शिवसैनिक

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा युती होणार की नाही यावर अजूनतरी प्रश्न आहे.  भाजपा व शिवसेना नेमक्या किती जागांवर लढणार हे अद्याप काहीच स्पष्ट होतांना दिसत नाही. युती साठी थेट  वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत.  मात्र विधानसभेपासून शिवसेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांमधील कटुता फार विकोपाला गेली आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी तर दोन्ही पक्ष एकमेकांन विरोधात पेटले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. 
 
मात्र हे सर्व एका बाजूला सुरु असतांना शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे एक मागणी लावून धरली आहे. युती झाली तर ईशान्य मुंबईतून भाजपाचे किरीट सोमय्या आम्हाला कदापि नको शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना स्पष्ट  सांगितलं आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर  टीका केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात सोमय्यांबद्दल प्रचंड राग दिसून येतो आहे. त्यामुळेच युती झाल्यास ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोमय्या नको, अशी ठाम शिवसैनिकांनी घेतली आहे. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार तर करणारच  नाहीत. उलट  एकही शिवसैनिक त्यांना आपले मत देणार नाही, असं शिवसैनिकांनी उद्धव यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या पुढे निवडणूक जिंकणे अवघड होणार आहे.