शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

आता काय बोलावे, बापाने दहा वर्षांच्या मुलाला विकले

कोल्हापूरात व्यसनाधीन बापाने दहा वर्षांच्या मुलाला विकण्याचा प्रकार केला आहे. बापानेच मुलासोबत असं कृत्य केलं आहे.  उत्तम पाटील असं मुलाला विकणाऱ्या बापाचे नाव आहे. 
 
मुलाचे वडील चांदी कारागीर असूनही व्यसनांच्या आहारी गेले होते. अशा परिस्थितीत मुलाचा सांभाळ करणं कठीण बनल्याने पोटच्या मुलाला तृतीयपंथीयाला विकल्याचा प्रकार उघडकीस आला. नोटरी द्वारे दत्तक करून मुलाला विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नातू कुठे दिसत नसल्यामुळे उत्तम पाटील यांच्या सासूने अनेकदा विचारणा केली. पण उत्तम पाटलांनी उडवा उडवीची उत्तर दिली अशा वेळी सासूला संशय आल्याने तिने सामाजिक संस्थेत धाव घेतली. आणि हा प्रकार उघडकीस आहे.  
 
कोरोनाच्या काळात काम नसल्यामुळे व्यसनाधीन झालेल्या बापाने हा प्रकार केला आहे. उत्तमच्या पत्नीलाही मानसिक आजाराची लागण झाली आहे. तर वृद्ध आई-वडील अशी कुटुंबाची व्यवस्था असताना बापाला मुलगा जड झाल्याने त्याने हा प्रकार केला आहे.