गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (11:48 IST)

धक्कादायक बातमी ! एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली

नगरच्या संगमनेर मधील एका बसस्थानकात एका एसटी बसचालकाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना  20 सप्टेंबर रोजी घडली.बस स्थानकात उभारल्या या बस मध्येच गळफास घेऊन एसटीच्या बस चालकाने आपले आयुष्य संपविले.या बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे आहे.हे एसटी महामंडळात चालक पदावर असून कोल्हार तालुक्यातील पार्थडी येथील निवासी होते.

प्राथमिक माहितीनुसार सध्या कोरोनामुळे एसटीच्या कामगारांना व्यवस्थित पगार मिळत नसून लोक कर्जबाजारी झाले आहे.वेळीच पगार न मिळाल्यामुळे कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.पार्थडी -नाशिक जाणारी ही एसटीची बस संगमनेरला येऊन डिझेल भरण्यासाठी थांबली होती. बस चालकाला डिझेल मिळाले नाही म्हणून या एसटी बसने रात्रीच बस स्थानकावर मुक्काम केला.बसचालक आणि वाहक दोघेच रात्रीच्या वेळी बस मध्ये थांबले होते.सकाळी वाहक दैनदिंन चे सर्व कार्यक्रम आटपून घेण्यासाठी बाहेर गेले असताना एसटी बसचालका ने कपड्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. पोलिसांकडून तपास सुरु आहे.