मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2024 (13:04 IST)

धक्कादायक! वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

arrest
पुण्यातील आळंदी परिसरात एका वारकरी संस्थामध्ये संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 11वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संस्था चालक आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ वय वर्ष 21 याला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार,दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत आपल्या मुलाला वारकरी शिक्षण घेण्यासाठी आपल्या पाल्याला पालकांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद भोकनळ  हा मुलांना शिक्षण देत होता. पीडित मुलांच्या पालकांनी मुलाला घरी पाहुणे आल्यामुळे आणले होते. तेव्हा मुलगा शिक्षण संस्थेत न जाण्यासाठी परत रडू लागला. तेव्हा पालकांनी त्याला न जाण्याचे कारण विचारले असता त्याने घडलेले सांगितले. त्या वेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपीने मुलाला हरिपाठ ला मुले गेल्यावर थांबविले नंतर एका खोलीत त्याला नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. कोणाला काहीही सांगितल्यावर तुला बघून घेईन अशी धमकी दिली. नंतर हा प्रकार उघडकीस आल्यावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिवप्रसादला अटक केली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit