मंगळवार, 9 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (16:33 IST)

धक्कादायक ! दिवाळीसाठी खरेदीला गेले आणि काळाने झडप घातली, हृदयविकाराचा झटक्याने व्यापाऱ्याचे निधन झाले

Shocking! Went shopping for Diwali and time flies
दिवाळीचा मोठा सण आपल्यासह आनंद आणि उल्हास घेऊन येतो. हा सण लहान आणि मोठ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. घरोघरी या सणाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. घराघरात या सणासाठी 15 दिवसापूर्वीच जय्यत तयारी सुरु असते. बाजारपेठ तर गर्दीने फुलले असते. सणा निमित्त खरेदी करण्यासाठी सर्व बाहेर पडतात. बुलढाणा मध्ये जे काही घडले ते हृदयद्रावकच आणि धक्कादायकच आहे. सणानिमित्त खरेदी करण्यासाठी स्वस्त धान्य व्यापारी असलेले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याचे पळसोडा येथील राहणारे विलासमोरे हे कपडे खरेदी करण्यासाठीआसलगाव येथे हरिओम ड्रेसेस दुकानात गेले असता त्यांच्या वर काळाने झडप घातली. त्यांना तिथेच जोरात हृदयविकाराचा झटका आला आणि ते खालीच कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मोरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.