शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (22:01 IST)

उघडू शकतात शॉपिंग मॉल, सिनेमा हॉलमध्ये लागू होऊ शकतात ‘हे’ नियम

भारतात जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन आणखी १४ दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे. सोमवारी १८ मेपासून सुरू झालेला आणि ३१ मे रोजी संपणारा हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. या संपूर्ण प्रकरणावर पीव्हीआरचे अध्यक्ष आणि एमडी अजय बिजली यांनी सांगितले की, १५ जूनच्या आसपास शॉपिंग मॉल्स सुरू होऊ शकतात. त्याच्या १-२ आठवड्यांनंतर सिनेमा हॉल सुरू करण्यासही मान्यता दिली जाऊ शकते. मार्च अखेरपासून देशातील सर्व शॉपिंग मॉल्स आणि सिनेमा हॉल बंद आहेत.
 
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात एनडीएमएने केंद्र सरकार आणि राज्यांना लॉकडाऊन सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर गृहमंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल्स, जिम, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, थिएटर, सभागृह व असेंब्ली हॉल बंद राहतील.
 
आता येणार सिनेमागृहात बसण्याचे नवीन नियम
अजय बिजली पुढे म्हणाले की, सिनेमा हॉलमध्ये बसण्यासाठी काही बदल केले जाऊ शकतात. जसे, फॅमिली आणि ग्रुप एकत्र बसवले जातील. तर इतर लोकांना बसण्यासाठी काही अंतर ठेवले जाईल. लॉकडाऊननंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ शकतात. तसेच सगळ्या लोकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणे हे सोपे काम नाही.
 
यापूर्वी १५ मे रोजी पीव्हीआरने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चित्रपटांच्या प्रदर्शनासंदर्भात एक निवेदन जारी केले होते. या निवेदनाद्वारे चित्रपट निर्मात्यांना त्यांनी चित्रपटगृह सुरू होईपर्यंत त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याची विनंती केली. पीव्हीआर पिक्चर्सचे सीईओ कमल ज्ञानचंदानी म्हणाले की, ‘आमचा विश्वास आहे की, थिएटर रिलीज हा आमच्या चित्रपट निर्मात्यांची मेहनत आणि सर्जनशील प्रतिभा अनुभवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर जगात अनेक दशकांपासून घडत आहे.’