शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोलापूर , सोमवार, 27 एप्रिल 2020 (15:05 IST)

कुमठ्यात विहिरीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

उत्तर सोलापूर तालुक्यातील  कुमठेगाव येथे भोपळे वस्तीत शेतात असणार्‍या विहिरीतील पाण्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

स्वराज सुजित भोपळे (वय 3) व स्वराली सुजित भोपळे (वय 2,दोघे राहणार कुमठेगाव) अशी मरण पावलेल्या बहीण-भावंडांचीनावे आहेत.

रविवारी सांकाळी सहा वाजणच्या सुमारास स्वराज व स्वराली हे भोपळे वस्तीतील शेतातील विहिरीजवळ खेळत होते. खेळत असतानाच ते दोघेही नकळत विहिरीतील पाण्यात पडले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना विहिरीतून बाहेर काढून वडिलांनी बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे.

या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. चिमुकल्या बहीण-भावांचा मृत्यू झाल्याने   परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.