1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जून 2018 (15:27 IST)

निलम गोऱ्हे यांच्या घरी निघाला विषारी साप

snake in nilam's house
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील घरात सकाळी 5 च्या सुमारास विषारी साप आढळला. गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पोलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांच्या ही बाब निदर्शनास आली. घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सापाला पकडून कात्रज सर्पाद्यानाकडे सूपूर्त करण्यात आले. गोऱ्हे यांच्या घरी विषारी साप आढळल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.
 
गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरातील कार्यालयात 3 फूट लांबीचा हिरवळ हा विषारी साप आढळला. ही बाब लक्षात येताच गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पोलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांनी गणेश कुलथे यांच्या मदतीने या सापाला सुरक्षितरित्या पकडून एका बाटलीत ठेवले. त्यानंतर पुण्यातील कात्रज सर्प उद्यानाशी संपर्क करुन त्या सापाला सर्पमित्र राहुल रणधीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.