मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (17:09 IST)

चक्क खिचडीत शिजवला साप, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या मध्यान्ह भोजनावेळी दिलेल्या खिचडीत चक्क साप शिजवला गेला आहे. हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी  दुपारी खिचडी खात असताना एका विद्यार्थ्यांच्या ताटात हा साप आढळला. विद्यार्थ्यांने शिक्षकांना ही बाब सांगितली असता विद्यार्थ्यांना खिचडी न खान्याचा सल्ला शिक्षकांनी दिला. त्यानंतर या खिचडीची विल्हेवाट लावण्यात आली. विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व विद्यार्थ्यांची प्रक्रती स्थिर असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, शाळेच्या गलथान कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.