सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (09:50 IST)

तर राज्याचं नक्कीच भलं होईल : उद्धव ठाकरे

‘आम्ही राज्यपालांना २ दिवसांची मुदत मागितली होती. पण राष्ट्रपती राजवट लागू करून राज्यपालांनी आम्हाला ६ महिन्यांची मुदत दिली आहे. या दरम्यान आता आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चर्चा करून आमचा दावा पुढे नेऊ, असं  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  ‘इतके दयावान राज्यपाल मी पाहिले नाहीत. असे राज्यपाल जर राज्याला लाभले असतील, तर राज्याचं नक्कीच भलं होईल’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टोला लगावला.
 
भाजपची मुदत संपल्यावर आम्हाला बोलावलं जाईल अशी आमची अपेक्षा होती. ती मुदत संपण्याआधीच आम्हाला राज्यपालांचं पत्र आलं आणि त्यांच्या मुदतीतच आम्हाला मुदत देण्यात आली. पत्रामध्ये साडेसात वाजेपर्यंतची दाव्यासाठी मुदत दिली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये हे समोर आलं की  आम्ही त्यांना अधिकृत संपर्क केला. मित्रपक्षांचं म्हणणं होतं की आम्ही तीन तीनदा संपर्क केला. त्याला ते उत्तर होतं.