मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (23:07 IST)

म्हणून जन्मदात्या आईची मुलानेच केली हत्या

So the child killed
वसईत 18 वर्षांच्या तरुणाने वादातून आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली.   वसईत 18 वर्षांच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली. सई पश्चिमेच्या कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (वय 59) ही महिला मुलगा सनी (18) आणि मुलगी पूजासोबत राहत होती. मेरी हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. 
 
आईला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात वाद-विवाद होत होते. मंगळवारी या वादातून मुलगा सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी वसई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक केली.सनीचे 12वी पर्यंत शिक्षण झाले असून आईला असलेल्या मद्याच्या व्यसनामुळे सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून मुलाने आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सतत दारूच्या पित असल्याच्या कारणावरून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपी मुलाला अटक करण्यात आली.