शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (15:06 IST)

solapur: दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांचा मृत्यू

वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर करावे.असे वाहतूक विभाग नेहमी सांगत असतात.तरीही वाहतुकीच्या नियमांचे पालन कोणीच करत नाही. या मुळे अपघात घडतात. दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या एकाच गावातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे. 

सदर घटना सोलापुरातील महावीर चौकात भर रस्त्यावर मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरून तिघे मित्र ट्रिपलसीट जातात असताना रविवारी मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. त्यात निखिल कोळी(24) , दिग्विजय आतिश सोमवंशी (21), आणि इरण्णा मठपती (24), गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. 

 एकाच गावातील तिघे तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाच्या अपघाताची माहिती कळतातच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.तिथे त्यांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला.पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.  
 
 
 Edited by - Priya Dixit