सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 जानेवारी 2023 (21:29 IST)

सोमय्या यांचे सूचक विधान..... साई रिसॉर्ट जप्त होतेय नंतर अनिल परब ही…”

Kirit Somaiya
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक विधान केलं आहे. “अखेर अनिल परबांचा हिशोब होतोय, ईडीने अनिल परबांवर कारवाई सुरू केली आहे. आता तर अनिल परबांची मालमत्ता साई रिसॉर्ट जप्त होतेय नंतर अनिल परबही…” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor